नववर्षाचे स्वागत गडांच्या सहवासात

By Admin | Updated: January 1, 2015 00:29 IST2015-01-01T00:27:33+5:302015-01-01T00:29:28+5:30

कोल्हापूर हायकर्स ग्रुप : साफसफाईने सुरुवात; गडावर मद्यप्राशन न करण्याचे आवाहन

New year's reception with the support of the castle | नववर्षाचे स्वागत गडांच्या सहवासात

नववर्षाचे स्वागत गडांच्या सहवासात

प्रदीप शिंदे- कोल्हापूर -नववर्षाचे स्वागत म्हणजे मोठ्याने गाणी लावून डान्स करून धांगडधिंगा घालणे अशीच काहीशी संकल्पना युवापिढीची बनली आहे. यासाठी इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले प्रमुख स्थळ बनताहेत. शिवाजी महाराजांनी याच गड-किल्ल्यांच्या साहाय्याने आपले स्वराज्य उभे केले. त्याच गड-किल्ल्यांवर नववर्षाची सुरुवात ही न पाहण्यासारखी असते. गड-किल्ल्यांची साफसफाई करून नववर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम कोल्हापूर हायकर्स ग्रुप गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहे.
बदलत्या काळात नव्या पिढीला आपल्या इतिहासाची ओळख व्हावी, त्यांनी किल्ल्यांचे महत्त्व, पावित्र्य जपावे, यासाठी धडपणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून ‘कोल्हापूर हायकर्स’ची ओळख आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला पारंपरिक जल्लोषामुळे भरकटणाऱ्या या तरुणाईला या सर्वांपासून दूर ठेवून आपल्या गड-किल्ल्यांच्या सहवासात नववर्ष साजरे करण्यासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे पहिल्यांदा रांगणा, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जीवधन किल्ल्याची निवड केली. या ठिकाणी नववर्षाच्या पहिल्या दिवशी साफसफाई करण्यात आली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या युवापिढीला दारू, सिगारेटच्या दुष्परिणामाचे महत्त्व पटवून देत किल्ल्यांचे पावित्र्य जपण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. त्यांच्या उपक्रमासही युवापिढीने चांगला प्रतिसाद दिला. मिळालेला प्रतिसाद पाहून यंदा हरिश्चंद्रगडाची निवड करण्यात आली आहे.
तरुणाई आपला इतिहास कुठेतरी विसरत चालली आहे. त्याचबरोबर ३१ डिसेंबरचा जल्लोष कुठेतरी आपल्या संस्कृतीपासून दुरावत चालला आहे. भरकटणाऱ्या तरुणाईस थोड्या प्रमाणात का होईना या सर्व जल्लोशापासून दूर नेण्यासाठी हा ग्रुप धडपडत आहे. अशाप्रकारचे उपक्रम नक्कीच तरुणाईला एक वेगळी दिशा देण्यासाठी मदत करेल.

तरुण पिढीमध्ये गड-किल्ले म्हणजे दंगा-मस्ती करण्याचे ठिकाण आहे, असे वाटते. या गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी अनेकांनी प्राण गमाविले आहेत. हा इतिहास नव्या पिढीने जपला तरच तो टिकेल म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहेत. ३१ डिसेंबरला आम्ही गड-किल्ल्यांवर जातो. त्या ठिकाणी नागरिकांना मद्यपान करू नका, असे आवाहन करतो. एक जानेवारीला गडावरील कचरा साफ करतो. यासह पर्यटकांसाठी गड-किल्ल्यांबाबतचा इतिहास त्यांना सांगतो. आमच्यासोबत दहा युवक आले तरी चालतील. पुढील वर्षी हेच युवक अन्य दहाजणांना घेऊन अन्य गडांवरती जातील. त्यातून आपला इतिहास जपला जाईल. - सागर पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर हायकर्स ग्रुप.

Web Title: New year's reception with the support of the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.