शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

नव्या वर्षात एस. टी. कर्मचाऱ्याचा नवा ‘लूक’ ..महामंडळाने बदलला कर्मचाºयांचा गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:47 IST

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक-वाहकांसह अधिकाऱ्या च्या गणवेशाचा रंगामध्ये बदल करण्यात आल्याने

ठळक मुद्देया नवीन बदलांमुळे एस. टी. कर्मचाºयांची मरगळ नक्कीच दूर होणार रिफ्लेक्टर्स यांत्रिक कर्मचाºयांच्या गणवेशालाही

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक-वाहकांसह अधिकाऱ्या च्या गणवेशाचा रंगामध्ये बदल करण्यात आल्याने नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवड्यापासून एस. टी. चे कर्मचारी आता नवा लूकमध्ये दिसणार आहेत.

राज्य परिवहन मंडळाने काळानुसार आपल्या बदल करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक गाड्या मागे टाकत ‘शिवशाही’सारख्या नव्या आरामदायी गाड्या रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. बसस्थानकासह सर्वच पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या बदलांसोबत कर्मचाऱ्या यांच्या गणवेशात बदल करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अभिमत संस्थेकडे गणवेश डिझाईन तयार करून घेतले आहेत. कर्मचाºयांच्या गरजा व उपयोगीता जाणून घेऊन नव्या गणवेशांचे डिझाईन बनविण्यात आले आहे. यासह सर्व कर्मचाºयांना बूटही देण्यात येणार आहेत.विविध सोळा पदांच्या कर्मचाऱ्या च्या गणवेशात बदल.....चालक-वाहकांबरोबरच वाहतूक नियंत्रक, साहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक व साहाय्यक वाहतूक अधीक्षक या कर्मचाऱ्या ना खाकी रंगाचा गणवेश देण्यात आला असून, जस-जसा संवर्ग बदलत जाईल, तस-तसा खाकी रंग फिकट होत जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील कर्मचाऱ्या ची वेगळी ओळख निर्माण होईल. अशाच प्रकारे यांत्रिकी कर्मचाऱ्यायांना निळ्या रंगाचा गणवेश दिला असून, त्यांच्या बदलत्या संवर्गानुसार गणवेशाचा रंग निळ्यापासून राखाडी रंगापर्यंत बदलत जाणार आहे. विशेष म्हणजे एस. टी. महामंडळातील महिला कर्मचाºयांच्या सूचनेनुसार त्यांच्यासाठी ‘सलवार-कुर्ता’ स्वरूपातील गणवेश निश्चित केला असून, त्यावर परिधान करण्यासाठी आकर्षक जाकीट दिले जाणार आहे. या जाकिटाला चार खिसे लावण्यात आले असून, सुटे पैसे, नाणी व रोकड ठेवण्यासाठी महिला वाहकांना त्याचा उपयोग होईल. ज्या महिला साडी परिधान करतात, त्यांच्यासाठी जाड काठापदराची साडी व त्यावर जाकीट दिले आहे. या नवीन बदलांमुळे एस. टी. कर्मचाºयांची मरगळ नक्कीच दूर होणार आहे.गणवेशावर ‘रिफ्लेक्टर्स’चालक, वाहकांसाठी गडद खाकी रंगाचा गणवेश निवडण्यात आला असून, या गणवेशाला सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘रिफ्लेक्टर्स’ लावण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी बंद पडलेली राज्य परिवहनची बसचालक, वाहक रस्त्यावर उतरून दुरूस्त करत असताना रस्त्यावरून जाणाºया अन्य वाहनचालकांच्या ते दृष्टिक्षेपात यावेत, यासाठी ही योजना केली असून, असेच रिफ्लेक्टर्स यांत्रिक कर्मचाºयांच्या गणवेशालाही लावण्यात आले आहेत.असे आहेत गणवेश१) सलवार-कुर्ता किंवा साडी - महिला वाहक२) खाकी रंगात - चालक३) पांढरा रंग - शिपाई४) खाकी - अधिकाºयांचे चालक५) राखाडी रंगाचा गणवेश - सहायक कार्यशाळा अधीक्षक६) गडद निळा - यांत्रिकी कर्मचारी७) खाकी रंगात - वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षक८) चॉकलेटी रंगात - वाहतूक नियंत्रक.पहिल्याच आठवड्यात वाटप...राज्यातील सर्व आगारांमध्ये सहा जानेवारी २०१८ रोजी दुपारी तीन वाजता या नव्या गणवेश वाटप सोहळा होणार आहे. प्रतिनिधीक स्वरूपात दहा जणांना प्रथम गणवेश वाटप केला जाणार आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी गणवेशांचे वाटप केले जाईल.एस. टी. महामंडळाच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सोळा पदांच्या कर्मचाºयांच्या गणवेशाच्या रंगात बदल करण्यात येणार आहे. नव्या वर्षांत कर्मचारी आता नव्या गणवेशात पाहण्यास मिळणार आहेत.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर