शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपद खुले, वडगावात हाय व्होल्टेज लढाई; कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:45 IST

डाॅ. अशोक चौगुले यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता

पेठवडगाव : आरक्षण सोडतीमध्ये नगराध्यक्षपद (खुले) सर्वसाधारण निश्चित झाल्यामुळे वडगावच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. यादव पॅनल आणि युवक क्रांती आघाडी यांच्यात जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आरक्षणाची सोडत निघताच पेठवडगावात कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू झाले आहे.यादव पॅनलकडून उमेदवारीसाठी विद्या पोळ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर ‘विद्याताईच नगराध्यक्षा’ अशा पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात झाली आहे. युवक क्रांती आघाडीकडून प्रविता सालपे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. युवक क्रांतीचे रंगराव पाटील बावडेकर, अजय थोरात, पुन्हा सोबत आलेले मोहनलाल माळी यांची भूमिका काय राहणार हे महत्त्वाचे आहे. दोन्ही गटांमधील कार्यकर्ते सोशल मीडियावर आणि जनसंपर्कातून आपापल्या उमेदवारांचे समर्थन करत आहेत.मागील निवडणुकीत नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित होते. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत युवक क्रांती आघाडीने विजय मिळवला होता. वडगावात पक्षीय चौकटीपेक्षा स्थानिक स्तरावरील गटबाजी व वैयक्तीक संपर्कावर निवडणुकीचे समीकरण अवलंबून असते.दरम्यान, डाॅ. अशोक चौगुले यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांच्या गटाची ताकद मर्यादित आहे. तरी ते उमेदवार असणार की, कोणत्या पॅनलच्या बाजूने की, पक्षीय पातळीवर उभे राहतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. आता प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारीचे समीकरण कसे बसते. यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Wadgaon's mayoral election heats up after open category announcement.

Web Summary : Wadgaon's mayoral race intensifies as the seat is declared open. Yadav Panel and Yuwak Kranti Aaghadi are expected to clash. Social media buzzes with support for potential candidates Vidya Pol and Pravita Salpe. Dr. Ashok Chaugule's role remains crucial. Local dynamics heavily influence elections.