इचलकरंजी नगरपालिकेत जुन्यांचीच नवीन नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:18+5:302021-01-08T05:22:18+5:30
सभापतींच्या बिनविरोध निवडी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडणुकीत भाजप, काॅंग्रेस (आवाडे गट) व ...

इचलकरंजी नगरपालिकेत जुन्यांचीच नवीन नांदी
सभापतींच्या बिनविरोध निवडी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडणुकीत भाजप, काॅंग्रेस (आवाडे गट) व राजर्षी शाहू विकास आघाडीचीच सत्ता कायम राहिली. त्यामध्ये सर्व समित्यांची अदलाबदली करून बिनविरोध निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी काम पाहिले.
पाणीपुरवठा सभापतीपदी दीपक सुर्वे, आरोग्य समिती संजय केंगार (दोघे आवाडे गट), बांधकाम समिती उदयसिंह पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी), महिला व बालकल्याण समिती सारिका पाटील व शिक्षण समिती मनोज साळुंखे (दोघे भाजप), उपसभापतीपदी सुनीता शेळके यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्षा अलका स्वामी, पाचही सभापती, तसेच सागर चाळके, युवराज माळी, शकुंतला मुळीक यांच्या निवडी झाल्याचे प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी घोरपडे नाट्यगृहात झालेल्या विशेष सभेत जाहीर केले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
गतवर्षी बांधकाम व शिक्षण आवाडे गटाकडे, पाणीपुरवठा व महिला बालकल्याण राजर्षी शाहू विकास आघाडीकडे, तर आरोग्य भाजपकडे होते. त्यामध्ये वरीलप्रमाणे बदल करून सत्ता कायम ठेवण्यात आली. चौकटी
स्थायी सदस्यसाठी चिठ्ठीवर निवड
स्थायी समिती सदस्यसाठी संख्याबळानुसार राजर्षी शाहू विकास आघाडी व ताराराणी आघाडी यांच्या नऊ-नऊ सदस्यांमुळे दोघांच्यात चिठ्ठी टाकण्यात आली. त्यातून सागर चाळके यांना सदस्यपद मिळाले.
‘ताराराणी’त शाब्दीक खडाजंगी
काॅंग्रेसमधील आवाडे गटाच्या नऊ सदस्यांमधून आरोग्य सभापती पदासाठी तिघांची नावे चर्चेत होती. त्यावरून सकाळी ताराराणी पक्ष कार्यालयात चर्चेवेळी ‘त्या’ सदस्यांमध्ये शाब्दीक खडाजंगी उडाली होती. त्यातून काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
(फोटो) ०६०१२०२१-आयसीएच-०२ (दीपक सुर्वे) ०६०१२०२१-आयसीएच-०३ (संजय केंगार) ०६०१२०२१-आयसीएच-०४ (उदयसिंह पाटील) ०६०१२०२१-आयसीएच-०५ (सारिका पाटील) ०६०१२०२१-आयसीएच-०६ (मनोज साळुंखे) ०६०१२०२१-आयसीएच-०७ (सुनीता शेळके)