बडतर्फ नगरसेवकांच्या जागी नवीन पदाधिकारी येणार

By Admin | Updated: July 11, 2015 00:10 IST2015-07-11T00:10:21+5:302015-07-11T00:10:21+5:30

महापालिका : २० जुलैला सभेत शिक्कामोर्तब

The new office bearers will be replaced by the Badshah Councilors | बडतर्फ नगरसेवकांच्या जागी नवीन पदाधिकारी येणार

बडतर्फ नगरसेवकांच्या जागी नवीन पदाधिकारी येणार

कोल्हापूर : जातीच्या अवैध दाखल्यामुळे नगरसेवकपद गमावलेले स्थायी समितीचे सदस्य सचिन चव्हाण व दिगंबर फराकटे, तसेच परिवहन सदस्य व महिला बालकल्याण उपसभापती रेखा आवळे यांच्या रिक्त जागा भरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सोमवारी (दि. २०) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.
गेली चार वर्षे न्यायालय व जात पडताळणी समितीच्या दणक्याने कॉँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती व सदस्य सचिन चव्हाण व दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २३, २५ (९), ३० (५) नुसार या रिक्त जागी उर्वरित कालावधीसाठी प्रमाणशीर पद्धतीने नामनिर्देशाद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा आवळे यांचाही दाखला बोगसगिरीने रद्द झाला. त्या परिवहन समिती सदस्य व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती होत्या. त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादीतर्फे दोन सदस्यांची निवड केली जाणार आहे. २० जुलैला होणाऱ्या सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. (प्रतिनिधी)

वर्षात चार नगरसेवक बाहेर
जात पडताळणीमुळे दाखल्याची बोगसगिरी उघड झाल्याने व न्यायालयाच्या दणक्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना महापालिकेच्या राजकारणातून ‘आउट’ व्हावे लागले. राष्ट्रवादीच्या माजी महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणामुळे नगरसेवकपद गमवावे लागले.
न्यायालयाने २०१० ची निवडणूकच रद्द केल्याने कॉँग्रेसच्या दिगंबर फराकटेंचे नगरसेवकपद गेले; तर सचिन चव्हाण व रेखा आवळे यांचा दाखला बोगस ठरल्याने त्यांना पद गमवावे लागले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत चार नगरसेवकांवर पद गमाविण्याची वेळ आली.

Web Title: The new office bearers will be replaced by the Badshah Councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.