शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँक आॅफ इंडियाचे ग्राहकांसाठी नवे मोबाईल अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:58 IST

स्टेट बँक इंडियाने (एसबीआय) ‘यू ओन्ली नीड वन’ (योनो) हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणारे आहे. कोल्हापुरातील ग्राहकांना या अ‍ॅपबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम बँक आणि केआयटी महाविद्यालयातर्फे सोमवार (दि. ११) पासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एसबीआय’चे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव आणि ‘केआयटी’ ‘आयएमईआर’चे संचालक डॉ. सुजय खाडिलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देस्टेट बँक आॅफ इंडियाचे ग्राहकांसाठी नवे मोबाईल अ‍ॅपप्रदीप देव यांनी दिली माहिती ; कोल्हापुरात सोमवारपासून मार्गदर्शन

कोल्हापूर : स्टेट बँक इंडियाने (एसबीआय) ‘यू ओन्ली नीड वन’ (योनो) हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणारे आहे. कोल्हापुरातील ग्राहकांना या अ‍ॅपबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम बँक आणि केआयटी महाविद्यालयातर्फे सोमवार (दि. ११) पासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एसबीआय’चे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव आणि ‘केआयटी’ ‘आयएमईआर’चे संचालक डॉ. सुजय खाडिलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.क्षेत्रीय प्रबंधक देव म्हणाले, या मोबाईल अ‍ॅपद्वारे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, पैसे दुसऱ्याला पाठविणे, कर्ज मिळविणे, आदी प्रक्रिया करता येणार आहे. विविध सेवा-सुविधा पुरविणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या ८५ कंपन्यांसमवेत ‘एसबीआय’ने करार केला आहे. या कंपन्यांची सुविधा अ‍ॅपमध्ये असणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी या अ‍ॅपची सुविधा उपलब्ध होईल.शेतकऱ्यांसाठी अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोल्हापूरमधील ग्राहकांना या अ‍ॅपची माहिती व्हावी यासाठी सोमवार (दि. ११) ते बुधवार (दि. १३) दरम्यान मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातील ‘एसबीआय’च्या शाखेपासून रॅलीने होईल.

रॅलीचे उद्घाटन बँकेच्या पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक अबिदउर रहेमान यांच्या हस्ते होईल. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, सीपीआर चौक असा रॅलीचा मार्ग आहे. डॉ. खाडिलकर म्हणाले, केआयटीमधील एमबीए, एमसीएचे १०० विद्यार्थी हे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या अ‍ॅपची ग्राहकांना प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत. पत्रकार परिषदेस प्रा. रंजना शिंदे उपस्थित होत्या.

एका दिवसात चेकचे क्लिअरिंगकोल्हापूर आणि सांगलीमध्ये बँकेच्या एकूण ५७ शाखा कार्यान्वित आहेत. या सर्व शाखांमध्ये सीटीएस चेकचे (धनादेश) एका दिवसात क्लिअरिंगची (समाशोधन) सुविधा उपलब्ध झाली असल्याचे देव यांनी सांगितले.

 

टॅग्स :SBIएसबीआयkolhapurकोल्हापूर