शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: न्यायालयाच्या जुन्या इमारतींना नवी झळाळी; सर्किट बेंचच्या उद्घाटनाची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:11 IST

सुरक्षेसाठी विशेष खबरदारी

कोल्हापूर : सर्किट बेंचचे उद्घाटन होण्यासाठी अवघा दोन आठवड्यांचा कालावधी उरल्याने सीपीआरसमोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्याचे काम गतीने सुरू आहे. अंतरबाह्य दुरुस्ती आणि रंगरंगोटीमुळे जुन्या इमारतीचा चेहरामोहरा बदलत आहे. हेरिटेज इमारत आणखी आकर्षक बनत आहेत, तर सर्वच इमारतींना नवी झळाळी येत आहे.कोल्हापुरातील न्यायिक परंपरेला सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. यातील बहुतांश काळ न्यायदानाचे काम सीपीआरसमोरील जुन्या इमारतींमधून चालले. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या इमारती आता पुन्हा सर्किट बेंचसाठी सज्ज होत आहेत. सर्वच इमारतींचे फायर ऑडिट केले असून, सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

वाचा: सर्किट बेंचचे उद्घाटन आता १६ ऐवजी १७ ऑगस्टला, ठिकाणही बदलण्याची शक्यता

भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले. जीर्ण झालेले दरवाजा, खिडक्या, छताचा भाग काढून दुरुस्ती केली जात आहे. आतील लाकडी बनावटीचे साहित्य पॉलिश केल्याने आणखी आकर्षक बनत आहे. विद्युतपुरवठा, जनरेटर, पाणी पुरविण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. साफसफाई आणि रंगकामामुळे इमारतींचा चेहरामोहरा बदलत आहे.सर्व इमारतींचा वापरचार मजली इमारतीत चार बेंचची व्यवस्था केली जात आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था असेल. राधाबाई बिल्डिंगमध्ये रेकॉर्डरूम असेल. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या इमारतीमधून प्रशासकीय कामकाज चालेल, अशी प्राथमिक माहिती ठेकेदारांकडून मिळाली.

वाचा: सर्किट बेंच सुरक्षेसाठी न्यायालयाच्या दारात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव

निवासस्थानांसाठी पोलिसांकडे मागणीसर्किट बेंचमधील कर्मचाऱ्यांसाठी जुना बुधवार पेठेतील पोलिसांच्या गृह प्रकल्पातील ३० फ्लॅटची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून अजून याला हिरवा कंदील मिळालेला नाही. न्यायमूर्तींसाठी प्रतिभानगर येथील एका इमारतीमधील सर्व फ्लॅट बुक केले आहेत.