न्यू कॉलेजला विजेतेपद

By Admin | Updated: November 17, 2014 00:36 IST2014-11-17T00:33:44+5:302014-11-17T00:36:38+5:30

आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धा : शहाजी कॉलेजला उपविजेतेपद

New College wins title | न्यू कॉलेजला विजेतेपद

न्यू कॉलेजला विजेतेपद

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू कॉलेजने विजेतेपद, तर शहाजी कॉलेजने उपविजेतेपद पटकाविले. कोपार्डेच्या स. ब. खाडे संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते विजेत्या संघाला, उपविजेत्या संघाला प्राचार्य डॉ. एस. वाय. कोतमिरे यांच्या हस्ते, तर स. ब. खाडे महाविद्यालय कोपार्डेच्या संघाला अजित खराडे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून सुनील पाटील, एम. एस. बोजगर, गणपत हुलसार यांनी काम पाहिले. प्रा. राहुल मगदूम यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
यावेळी दुंडाप्पा नेवडे, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. अनिल कुराडे, किरण डोमणे, बसवराज आजरी, राजशेखर यरटे, अमोल हातरोटे, अरुण कुलकर्णी, प्रा. अभिजित वणिरे, डॉ. शिवराज गायकवाड, प्रा. गणेश सिंहासने, निरीक्षक प्रा. सुरेश धुरे, अर्जुन चौगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: New College wins title