कागल, करवीरमधील ९४ गावांतील मालमत्तांची नव्याने मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:14 PM2020-10-23T19:14:59+5:302020-10-23T19:17:18+5:30

मालमत्तांच्या जागांवरून तक्रारी व वादाचे प्रसंग घडत असल्याने कागल तालुक्यातील ३९ आणि करवीर तालुक्यातील ५५ अशा ९४ गावांची नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखाच्या बैठकीनंतर पुढील महिन्यात मोजणीचे आदेश देण्यात आले.

New census of properties in 94 villages in Kagal, Karveer | कागल, करवीरमधील ९४ गावांतील मालमत्तांची नव्याने मोजणी

कागल व करवीर तालुक्यांतील मालमत्ता मोजणीच्या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखची बैठक झाली.

googlenewsNext
ठळक मुद्देकागल, करवीरमधील ९४ गावांतील मालमत्तांची नव्याने मोजणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पुढील महिन्यात होणार मोजणी

कोल्हापूर : मालमत्तांच्या जागांवरून तक्रारी व वादाचे प्रसंग घडत असल्याने कागल तालुक्यातील ३९ आणि करवीर तालुक्यातील ५५ अशा ९४ गावांची नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखाच्या बैठकीनंतर पुढील महिन्यात मोजणीचे आदेश देण्यात आले.

बैठकीत भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तारखेस घराच्या व इतर मालमत्तेच्या बिनचूक मोजणीसाठी घरमालकाने उपस्थित राहून आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, नगररचनाकार मा. अ. कुलकर्णी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर उपस्थित होते.

येत्या मंगळवारी बैठक

गावनिहाय समिती बनवून नियोजन करावे; तसेच ग्रामसभा आणि ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाची पूर्वतयारी करावी. या संदर्भात येत्या मंगळवारी (दि. २७) संबंधित तहसीलदारांनी सर्व यंत्रणांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

कागल ३९- ठाणेवाडी, बोळावी, बोळावीवाडी, हसूर बुद्रुक, तमनाकवाडा, वडगाव, बेलेवाडी का., कासारी, बेलेवाडी मासा, बाळीक्रे, आलाबाद, मुगळी, जैन्याळ, करड्याळ, अर्जुनवाडा, नंद्याळ, अर्जुनी, लिंगनूर, कापशी, गलगले, मेतके, बस्तवडे, सोनगे, कुरुकली, सुरुपली, करंजीवणे, हळदवडे, दौलतवाडी, बेनिक्रे, शिंदेवाडी, भडगाव, कुरणी, चौंडाळ, पिराचीवाडी, सावर्डे खुर्द, केनवडे, पिंपळगाव बु. केंबळी, बामणी, शंकरवाडी.

करवीर ५५- आडूर, आरळे, उजळाईवाडी, उपवडे, आरडेवाडी, कळंबे तर्फ कळे, कांचनवाडी, कांडगाव, कावणे, कुर्डू, कुरुकली, पडवळवाडी, कोगील खु., कोगील बु., कोथळी, कंदलगाव, गर्जन, गोकुळ शिरगाव, घानवडे, घुंगूरवाडी, चाफोडी तर्फे आरळे, चिंचवडे तर्फे कळे, चुये, जठारवाडी, जैताळ, तामगाव, तेरसवाडी, दोनवडी तर्फे हवेली, नागाव, निठवडे, विकासवाडी, नंदवाळ, मोरेवाडी, पाटेकरवाडी, पाडळी बु., पासार्डे, शिपेकरवाडी.
भाटणवाडी, भामटे, मांजरवाडी, मादळे, मांडरे, म्हारुळ, म्हालसवडे, वडगाव खु., वाडवारी, वाडीपीर, सडोली दुमाला, सरनोबतवाडी, सादळे, सावर्डे इनाम, हलसवडे, हासूर, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला.

 

Web Title: New census of properties in 94 villages in Kagal, Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.