शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

‘त्यांच्या’ जगण्याला मिळाले नवे सौंदर्य, कोल्हापुरात  मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:11 IST

दुभंगलेले ओठ जोडण्यासह चेहऱ्यावरील विद्रुप व्रण, डाग यांच्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याने सुमारे १२५ जणांच्या जगण्याला नवे सौंदर्य बुधवारी लाभले.

ठळक मुद्दे‘त्यांच्या’ जगण्याला मिळाले नवे सौंदर्य, कोल्हापुरात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरभारतीय जैन संघटनेचा उपक्रम, पहिल्या दिवशी चारशे जणांनी नोंदणी

कोल्हापूर : दुभंगलेले ओठ जोडण्यासह चेहऱ्यावरील विद्रुप व्रण, डाग यांच्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याने सुमारे १२५ जणांच्या जगण्याला नवे सौंदर्य बुधवारी लाभले. भारतीय जैन संघटना (बीजेएस), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि जैन डॉक्टर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचा प्रारंभ झाला.त्याच्या पहिल्या दिवशी सुमारे चारशे जणांनी नोंदणी केली.प्लास्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता ‘बीजेएस’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पारस ओसवाल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबीराचे उदघाटन झाले. 

 कोल्हापुरात बुधवारी प्लास्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ भारतीय जैन संघटना, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि जैन डॉक्टर्स फेडरेशनच्यावतीने आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीरासाठी कोल्हापूरसह राज्यभरातील रूग्ण सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार )

यावेळी ओसवाल म्हणाले, या प्लास्टिक सर्जरी शिबीराचे यंदा अकरावे वर्ष आहे. त्यामध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाते. औषधे दिली जातात. या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश आहे.

पाटील म्हणाले, या उपक्रमाला डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सर्वोतोपरी सहकार्य केले जाते. यापुढील देखील राहील.

या कार्यक्रमास अमेरिकेतील डॉ. राजलाला, डॉ. अमित बसण्णावार, डॉ. प्रकाश संघवी, गिरीश कर्नावट, बी. एन. पाटील, वृषभ छाजेड, अनिल पाटील, अतुल भंडारी, आदी उपस्थित होते. प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शितल पाटील यांनी स्वागत केले. ‘बीजेएस’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिनंदन खोत यांनी आभार मानले.

राज्यभरातील रूग्णांची उपस्थितीया शिबीराच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरसह पुणे, सातारा, इंदापूर, कराड आदींसह राज्यभरातील सुमारे चारशे रूग्णांनी नोंदणी केली. सकाळी दहा ते दुपारी साडेबारापर्यंत नोंदणी केलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी एक ते सायंकाळी पाच यावेळेत सुमारे १२५ जणांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.

त्यामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यांवरील विद्रुप व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती दूर करणाऱ्या शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आल्या. रक्ततपासणी, भूलतज्ञ यांची आवश्यकता असणाऱ्या शस्त्रक्रिया गुरूवारी केल्या जाणार असल्याचे डॉ. शितल पाटील यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर