अकरावीच्या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:58+5:302020-12-11T04:49:58+5:30
दुसऱ्या फेरीत काय करता येईल? १) ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करावयाचा आहे, त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून ...

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज करता येणार
दुसऱ्या फेरीत काय करता येईल?
१) ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करावयाचा आहे, त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून रद्द करावा. नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरावा.
२) ज्या विद्यार्थ्यानी अद्यापही रजिस्टर भाग एक, दोन भरलेला नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन अर्जा करता येईल.
३) ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट होऊन त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही, अर्जाच्या भाग दोनमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, त्यांची नावे दुसऱ्या फेरीमध्ये ऑटो शिफ्ट होतील.
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
अर्ज करणे : १४ ते १६ डिसेंबर
अर्जांची छाननी : १७ ते १९ डिसेंबर
निवड यादीची प्रसिद्धी : २१ डिसेंबर
प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही : २१ ते २३ डिसेंबर
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
दाखल अर्ज : १२६९१
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : ५८३५
प्रवेशित शिल्लक विद्यार्थी : ६८५६