नेज-शिवपुरी-कुंभोज हद्दीत गव्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:15+5:302021-04-25T04:23:15+5:30
: नेज-शिवपुरी, कुंभोज (ता. हातकणंगले)च्या हद्दीत बाबूजमाल दर्ग्याजवळ डोंगराच्या पायथ्याशी शेतामध्ये शनिवारी सकाळी चार गवे आढळले. त्यामुळे ...

नेज-शिवपुरी-कुंभोज हद्दीत गव्याचा वावर
: नेज-शिवपुरी, कुंभोज (ता. हातकणंगले)च्या हद्दीत बाबूजमाल दर्ग्याजवळ डोंगराच्या पायथ्याशी शेतामध्ये शनिवारी सकाळी चार गवे आढळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी सकाळी शेतकरी शेतात काम करीत असताना अशा प्रकारे अचानक गवे नजरेस पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. भागात आलेले गवे काही वेळ शेतातच राहिले. नंतर त्यांना जवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याला पाहण्यात आले.
गवे आल्याबाबतचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर येताच अनेक शेतकरी शेताकडे फिरकले नाहीत. जे गेले होते ते बातमी समजताच माघारी फिरले. वनविभागाने लगेच परिसरात आपले कर्मचारी तैनात केले आहेत.
सोबत फोटो-नेज –शिवपुरी व कुंभोज हद्दीत बाबूजमाल दर्ग्याजवळ शेतात गवे आढळले. (छाया- सुनील खिचडे, नेज)
bharat shastri 9422741695