'रवळनाथ'ची नेसरी शाखा ग्रामीण विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:07+5:302021-04-14T04:22:07+5:30

नेसरी शाखा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. प्रा. दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाखाध्यक्ष ...

Nesari branch of 'Ravalnath' is top in rural areas | 'रवळनाथ'ची नेसरी शाखा ग्रामीण विभागात अव्वल

'रवळनाथ'ची नेसरी शाखा ग्रामीण विभागात अव्वल

नेसरी शाखा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. प्रा. दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाखाध्यक्ष पाटील म्हणाले, सल्लागार, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले आहे. त्यात सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी सीईओ डी. के. मायदेव, शाखा सल्लागार प्रा. दादासाहेब पाटील, मुख्याध्यापिका शमा कुरणे, शाखाधिकारी किरण कोडोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. शाखा सल्लागार प्रा. व्ही. के. दळवी यांनी आभार मानले.

---------------------

* कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस

'रवळनाथ'च्या नऊ शाखांपैकी शहरी विभागात प्रथम आलेल्या बेळगाव आणि ग्रामीण विभागात प्रथम आलेल्या नेसरी शाखेतील कर्मचाऱ्यांना दरमहा ५०० रुपये याप्रमाणे प्रत्येकी सहा हजार इतकी रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून दिली जाईल, अशी घोषणा संस्थापक-अध्यक्ष चौगुले यांनी यावेळी केली.

---------------------

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील रवळनाथ शाखेचे अध्यक्ष प्राचार्य आर. बी. पाटील व सल्लागार यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी एम. एल. चौगुले, दत्ता पाटील, डी. के. मायदेव, दादासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

क्रमांक : १३०४२०२१-गड-०९

Web Title: Nesari branch of 'Ravalnath' is top in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.