विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी शेजाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST2020-12-30T04:33:01+5:302020-12-30T04:33:01+5:30

मुरगूड : मुरगूड (ता.कागल) येथील ज्योती सुनील शिंदे परीट (वय २८) या विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या शेजारी राहणारे धनाजी ...

Neighbors arrested for marital suicide | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी शेजाऱ्यांना अटक

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी शेजाऱ्यांना अटक

मुरगूड : मुरगूड (ता.कागल) येथील ज्योती सुनील शिंदे परीट (वय २८) या विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या शेजारी राहणारे धनाजी तानाजी बोते (वय ३२) त्याची आई शिऊ तानाजी बोते (५२) यांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ज्योती यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्योतीचे पती सुनील शिंदे परीट यांनी तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी २६ डिसेंबरला ज्योती सुनील परीट (शिंदे) हिने राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची नोंद मुरगूड पोलिसांत झाली होती. मृत ज्योतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली होती. त्यात शेजारी धनाजी बोते हा आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी बदनामी करण्याची भीती घालत होता तसेच तिच्याकडून घेतलेली अंगठी परत न देता तिला त्रास देत होता. धनाजी हा ज्योतीला त्रास देत असल्याचे त्याची आई शिऊ हिला माहिती असतानाही तिने पाठीशी घातल्याने आपण त्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. त्यामुळे वरील दोघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल तपास केला. त्यानंतर सोमवारी या दोघांना अटक केली.

याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे करत आहेत.

२८ ज्योती शिंदे परीट

Web Title: Neighbors arrested for marital suicide