शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या दिव्याखालचा अंधार तपासा, ललित पाटील प्रकरणी नीलम गोऱ्हे यांची सुषमा अंधारे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 12:30 IST

पुणे दंगलीबाबत बोलण्यास नकार

कोल्हापूर : ललित पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या फोटोतील दादा भुसे यांची चौकशी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. मात्र, त्या फोटोत उद्धव ठाकरेही आहेत. आता मग त्यांचीही चौकशी करायची का, असा प्रश्न उपस्थित करत, राजकीय पक्षांचे सातबारे पाहून टीका करणे योग्य नाही. आधी आपल्या दिव्याखाली असणारा अंधार तपासा, असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंधारे यांना लगावला. बुधवारी शासकीय विश्रामगृहात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.त्या म्हणाल्या, तो ललित पाटील इतके दिवस रुग्णालयात का होता, हे तपासले पाहिजे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी होईल. महिला आरक्षणासाठी २३ वर्षे वाट पाहावी लागली. पंधरा वर्षे यूपीएचे बहुमत असूनही महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज ओळखून हे विधेयक मंजूर करून घेतले.अनेक कठीण प्रसंगांमध्ये महाराष्ट्रात एकमत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यानुसार, मराठा आरक्षणाबाबतही होईल, असा आशावाद व्यक्त करताना सर्व राजकीय नेत्यांनी सांभाळून वक्तव्ये करावीत, असा सल्लाही त्यांनी गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावेळी दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, रवींद्र खेबूडकर उपस्थित होते.

पुणे दंगलीबाबत बोलण्यास नकारपुण्यातील २०१० सालच्या दंगलीबाबत मीरा बोरवणकर यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, मुळात २०१७ साली राज्य शासनाने हा खटलाच रद्द केला आहे. त्यामुळे त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNeelam gorheनीलम गो-हे