फुले यांच्या विचारांची सध्या गरज

By Admin | Updated: November 28, 2014 23:45 IST2014-11-28T23:18:06+5:302014-11-28T23:45:05+5:30

राजन गवस : महात्मा जोतीराव फुले यांचा १२४ वा स्मृतिदिन

The needs of Phule's ideas are currently needed | फुले यांच्या विचारांची सध्या गरज

फुले यांच्या विचारांची सध्या गरज

कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते.

Web Title: The needs of Phule's ideas are currently needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.