ध्येय प्राप्तीसाठी इच्छाशक्तीची गरज इच्छाशक्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:28 IST2021-08-19T04:28:02+5:302021-08-19T04:28:02+5:30

गडहिंग्लज : निश्चित ध्येय प्राप्तीसाठी अपार कष्ट व संघर्षाची तयारी आणि इच्छाशक्तीची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे ...

The need for willpower to achieve a goal | ध्येय प्राप्तीसाठी इच्छाशक्तीची गरज इच्छाशक्तीची गरज

ध्येय प्राप्तीसाठी इच्छाशक्तीची गरज इच्छाशक्तीची गरज

गडहिंग्लज : निश्चित ध्येय प्राप्तीसाठी अपार कष्ट व संघर्षाची तयारी आणि इच्छाशक्तीची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. येथील साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित दहावी-बारावी परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सतीश पाटील होते.

वाघमोडे म्हणाले, पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता त्यांचा कल पाहून आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी पाल्यांनी द्यावी तरच त्यांना ध्येय गाठता येईल. यावेळी प्रा. एस. बी. पाटील, प्रा. संतोष पाटील, विपुल रुईकर यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला कृषी अधिकारी युवराज भुईंबर, प्राचार्य स्वाती शिराळकर, टोबू थॉमस, जेम्स अब्राहम, कोमल चव्हाण, शगुफ्ता खलीफ, हिना काझी आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केला. यावेळी स्वाती शिराळकर, संतोष पाटील, एस. बी. पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : १८०८२०२१-गड-०४

Web Title: The need for willpower to achieve a goal