'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज
By Admin | Updated: May 19, 2015 00:21 IST2015-05-18T23:41:14+5:302015-05-19T00:21:13+5:30
‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा

'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज
कोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.
येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.
माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.
‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.
माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)