खरा इतिहास समाजासमोर मांडण्याची गरज : मेश्राम
By Admin | Updated: February 20, 2015 00:01 IST2015-02-20T00:00:55+5:302015-02-20T00:01:13+5:30
येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.

खरा इतिहास समाजासमोर मांडण्याची गरज : मेश्राम
निपाणी : ब्राह्मणवाद्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनसामान्यांच्या मनावर खोटा विचार अविरतपणे बिंबवित सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे समाजासमोर खरा इतिहास मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोराणेश्वर आप्पा स्वामीजी (गुलबर्गा), खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अविनाश कट्टी, बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष मौलाना हारीस, लातूर येतील मौलाना काशमी, अशोककुमार असोदे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, सुंदर कांबळे, राजेश कदम, नफीस मुजावर, डॉ. बी. व्ही. कोठीवाले, आदी उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर दलित व मायनॉरिटीला न्याय मिळालेला नाही. ६० वर्षानंतर ही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यकर्त्यांकडून या समाजाला न्याय देणे शक्य नाही. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने जातनिहाय सर्व्हे सुरू केल्याने फायदा होणार आहे. अनिल प्रधान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. सुरेश कांबळे, अॅड. अविनाश कट्टी, आदींनी मार्गदर्शन केले.