शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या साहित्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:22+5:302021-02-05T07:00:22+5:30
शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या ...

शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या साहित्याची गरज
शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने भारत देश आत्मनिर्भर बनण्यासाठी शेतकरीच आत्मनिर्भर बनला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर सोमवारी दिनबंधू स्व. दिनकरराव यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू बाळासाहेब पोकार्डे यांना कै. भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, तर डॉ. मोहन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वागत दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अनिल यादव, ‘दत्त’चे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, अरविंद यादव, रणजित कदम, दीपक कामत, दरगू गावडे, बजरंग काळे, दगडू माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी आभार मानले.
फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - शिरोळ येथे स्व. दिनकरराव यादव स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अनिल यादव, अशोकराव माने, लक्ष्मीकांत देशमुख, गणपतराव पाटील, जयंत आसगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.