वाठार येथील उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलकाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:19+5:302020-12-07T04:17:19+5:30
महामार्गावरील वाठार येथे काही अंतरावर उड्डाणपुलाची सुरुवात होते. उड्डाणपुलावरून कोल्हापूरसह कर्नाटक तसेच अन्य राज्यांत जावे लागते; तर पुलाखालून ...

वाठार येथील उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलकाची गरज
महामार्गावरील वाठार येथे काही अंतरावर उड्डाणपुलाची सुरुवात होते. उड्डाणपुलावरून कोल्हापूरसह कर्नाटक तसेच अन्य राज्यांत जावे लागते; तर पुलाखालून पूर्व दिशेला इचलकरंजी, जयसिगंपूर, नृसिंहवाडी बाहुबली व पश्चिम दिशेला जोतिबा- पन्हाळासह कोकणात जाण्यासाठी रस्ता आहे. पर्यटनसाठी व देवदर्शनास जाणारी बाहेरच्या जिल्ह्यांतील व राज्यातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा पूल लांबीचा असल्याने वाहनधारकांना मार्गच लक्षात येत नाही. येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांना रस्ता शोधण्यास कसरत करावी लागत असून महामार्गावरच वाहन थांबवून रस्ता विचारणे भाग पडते. काही वेळा वाहने पूल ओलांडून वाहने पुढे जातात. रात्री-अपरात्री रस्ता शोधणे मुश्किल आहे. याठिकाणी रस्ता शोधण्याच्या प्रयत्नांत बरेच अपघात घडले आहेत.