मौन पाळून ‘एनएसयुआय’ ने केला सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:21 IST2017-10-03T18:21:44+5:302017-10-03T18:21:44+5:30

एक तास मौन पाळून नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेने (एनएसयुआय) काल, सोमवारी सरकारचा निषेध केला.

The NCUI protested against the government's protest by silence | मौन पाळून ‘एनएसयुआय’ ने केला सरकारचा निषेध

मौन पाळून ‘एनएसयुआय’ ने केला सरकारचा निषेध

कोल्हापूर : एक तास मौन पाळून नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेने (एनएसयुआय) काल, सोमवारी सरकारचा निषेध केला.


येथील पापाची तिकटी परिसरातील महात्मा गांधी पुतळा येथे एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून एक तास मौन पाळून सरकारचा निषेध केला. देशातील तरुण लोकशाही मानणारे गांधीवादी विचारांचे आहेत. त्यामुळे महात्मा गांधीजी यांचे विचार कधीच कोणीही संपवू शकणार नाही, असा संदेश या तरुणांनी दिला.

यावेळी ‘एनएसयुआय’चे शहराध्यक्ष पार्थ मुंडे, सुशांत चव्हाण, शुभम तोरस्कर, अजिंक्य पाटील, सौरभ नाईक, स्वप्निल पाटील, आदित्य डोंगळे, अक्षय साळोखे, रोहित पोतनीस, वैभव देसाई, प्रसाद कदम, अभय शेळके आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: The NCUI protested against the government's protest by silence