शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राष्ट्रवादीने 'हातकणंगले' सोडला अन् 'स्वाभिमानी' हात आघाडीला जोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:02 IST

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे,

ठळक मुद्देखासदार महाडिक विश्रामगृहातील जुन्या सूटमध्ये बसून होते.कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याचे स्पष्ट करणाऱ्या पवार यांनी उमेदवारांबाबत मात्र कोणतेच भाष्य केले नाही

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे, असे संकेत देत कोल्हापूरचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दोन्ही कॉँग्रेसवर असल्याचे राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याचे स्पष्ट करणाऱ्या पवार यांनी उमेदवारांबाबत मात्र कोणतेच भाष्य केले नाही. किंवा खासदार महाडिक हेच पक्षाचे उमेदवार असतील असेही स्पष्ट केले नाही.

कोल्हापूरच्या जागेवर कॉँग्रेसने दावा केला असून खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतूनच उघड विरोध असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले,‘कॉँग्रेसने दावा केल्याचे आपण वृत्तपत्रांतच वाचले. येथे कोण काय म्हणाले तरी ‘कोल्हापूर’चा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदार दोन्ही कॉँग्रेसची आहे. कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी कोणीही टोकाची भूमिका घेणार नाही.’

यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उपमहापौर महेश सावंत, व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल साळोखे, रोहित पाटील, आदिल फरास, आदी उपस्थित होते.‘नियमन रद्द’चा निर्णय घातकचबाजार समित्यांच्या नियमन रद्दबाबत राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती केली. यामुळे शेतकºयांचा संपूर्ण माल व्यापाºयांनी खरेदी केलाच पाहिजे, असे बंधन राहिलेले नसल्याने हा निर्णय शेतकºयांच्या दृष्टीने घातक असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार-मुश्रीफ बंद खोलीत चर्चाअधिवेशनामुळे आमदार हसन मुश्रीफ शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात शरद पवार व मुश्रीफ यांची बंद खोलीत चर्चा झाली. त्यावेळी खासदार महाडिक विश्रामगृहातील जुन्या सूटमध्ये बसून होते. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर