शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

By विश्वास पाटील | Updated: July 3, 2023 13:15 IST

मुश्रीफांचे कागलच्या राजकारणात राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोनच आमदार होते परंतु ते दोघेही नव्या उलथापालथीमध्ये भाजप-एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोकळी झाल्याची प्रतिक्रिया उमटली. पण जे भाजपसोबत गेले आहेत, ते आम्हीच खरे राष्ट्रवादी असा दावा करू शकतात. परंतु पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाध्यक्ष शरद पवार यांंना सर्वाधिक बळ देणारा या जिल्ह्यात या पक्षाची स्थिती अस्तित्वासाठी झगडतोय अशी झाली आहे. लोकसभेसाठी दावा सांगणारा हा पक्ष आता विधानसभेसाठी उमेदवार शोधतानाही घामाघूम होईल. एकाच नेतृत्वाच्या हवाली पक्ष केल्याचा हा परिणाम आहे. त्याला पक्षाचेच नेतृत्वही तेवढेच कारणीभूत आहे.एकेकाळी दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील, दिग्विजय खानविलकर अशी नेतृत्वाची भक्कम फळी या पक्षात होती. या पक्षाची स्थापनेची महत्त्वाची बैठकच कोल्हापुरात खानविलकर यांच्या घरात झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा गड मानला गेला. दोन्ही खासदार आणि पाच आमदार या जिल्ह्याने या पक्षाला दिले. एकेकाळी पवार यांच्या पुणे जिल्ह्यात जेवढे राष्ट्रवादीचे बळ नव्हते तेवढी ताकद कोल्हापूरने दिली. परंतु नंतर या गडाच्या भिंती गटबाजीने ढासळल्या. मंडलिक की मुश्रीफ यांच्या वादात पवार यांनी मुश्रीफ यांना बळ दिले. साधारणत २००७ ला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या लढाईत मंडलिक गटाचा पराभव झाल्यावर राष्ट्रवादीतील मंडलिक-मुश्रीफ वाद विकोपाला गेला. मंडलिक पक्षातून बाहेर पडले व पक्षाची आणखी पडझड झाली. त्यानंतर मात्र मुश्रीफ हेच पक्षाचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी कागलच्या राजकारणासाठी जे सोयीचे असेल त्यानुसार पक्षाचा वापर केला. संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष दिले नाही. नव्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. त्यामुळे कागल, चंदगड आणि राधानगरी मतदार संघापुरताच हा पक्ष मर्यादित राहिला. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, बाजार समितीत पक्षाला सत्तेची संधी मिळाली परंतु त्यातून पक्ष बळकट झाला नाही. आताही या तीनच मतदार संघात पक्षाची ताकद आहे. लोकसभेसाठी दोन्ही मतदार संघात पक्षाकडे उमेदवारच नाही. कोल्हापुरात जरा तरी बरी स्थिती पण हातकणंगले मतदार संघात मात्र एकही आमदार नाही. तिथे झेंडा हातात घ्यायला कार्यकर्ते नाहीत. पक्षाच्या या स्थितीस स्वत: मुश्रीफच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पक्ष विस्तारला नाही. गेल्याच महिन्यात स्वत: अजित पवार यांनीच कागल सोडून पक्ष पुढे गेला नाही अशी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आता त्याच अजितदादांनी मुश्रीफ यांनाच सोबत घेऊन पक्ष बळकट करण्याचे जाहीर केले आहे. नव्या राजकीय उलथापालथी पाहता राष्ट्रवादीत शरद पवार यांच्याकडे कोण-कोण राहते यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहील.

सत्तेचे कायमच बळ..मुश्रीफ यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांची पक्ष व नेतृत्वाची निष्ठा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली. त्यामुळेच पक्षाने त्यांना सत्तेचे कायम बळ दिले. आता त्यांना जरुर मंत्रिपद मिळाले असले तरी कागलच्या राजकारणात त्यांचे राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ