गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:24+5:302021-09-18T04:26:24+5:30

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या कृत्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या ...

NCP protests in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या कृत्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या हे भाजपचे भुंकणारे कुत्रे आहेत, अशा आशयाचे पोस्टर झळकावून निषेध नोंदविला.

यावेळी राष्ट्रवादीचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, राजेश पाटील-औरनाळकर, माजी पं. स. सभापती अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण यांची भाषणे झाली. त्यानंतर सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

आंदोलनात, अभिजित पाटील-औरनाळकर, गंगाधर व्हसकोटी, महाबळेश्वर चौगुले, दीपक जाधव, अनिकेत कोणकेरी, जयकुमार मुन्नोळी, संतोष पाटील, वसंत यमगेकर, बाबूराव चौगुले, आण्णासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील दसरा चौकात राष्ट्रवादीतर्फे किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. यावेळी रामाप्पा करिगार, राजेश पाटील, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : १७०९२०२१-गड-०८

Web Title: NCP protests in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.