राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ‘ए. वाय.’; कार्याध्यक्षपदी पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:36 IST2018-08-15T00:36:52+5:302018-08-15T00:36:58+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ‘ए. वाय.’; कार्याध्यक्षपदी पाटील-यड्रावकर
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नियुक्ती केली असून, कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर आर. के. पोवार यांना संधी दिली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी या निवडीची घोषणा केली.
राष्टÑवादीच्या शहराध्यक्षपदासाठी मात्र रस्सीखेच होती. राजेश लाटकर, आर. के. पोवार, आदिल फरास, अनिल कदम आणि जयकुमार शिंदे इच्छुक होते. मध्यंतरी सर्वच इच्छुकांच्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुलाखती घेतल्या होत्या.
म्हणून ‘आर. कें’ना संधी !
राष्टÑवादीच्या स्थापनेपासून आर. के. पोवार हे शहराध्यक्ष होते.मध्यंतरी राजेश लाटकर यांना संधी दिली. त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा पोवार यांनी दावा केला. आगामी दोन-तीन महिन्यांत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आपला सत्कार समारंभ असल्याने आपणाला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी ‘प्रदेश’कडे केली होती.