राष्ट्रवादी पक्षातर्फे वृक्षारोपण, कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST2020-12-28T04:14:04+5:302020-12-28T04:14:04+5:30

कोल्हापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ८१ झाडे लावण्याचा संकल्प करण्यात ...

NCP planting trees, felicitating Corona warriors | राष्ट्रवादी पक्षातर्फे वृक्षारोपण, कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

राष्ट्रवादी पक्षातर्फे वृक्षारोपण, कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

कोल्हापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ८१ झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार पक्षाचे कार्यकर्ते माजी उपमहापौर संभाजी देवणे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शारदा देवणे यांनी मंगळवार पेठेतील शेळके उद्यान येथे वृक्षारोपण संकल्पनेचा प्रारंभ केला. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शामराव देवणे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बजापराव माने तालीम मंडळाच्या जुदो हाॅलमध्ये शहराध्यक्ष आर. के. पोवार व शामराव देवणे यांच्याहस्ते ३० कोरोना योद्ध्‌यांचा सत्कार करण्यात आला. पोवार यांनी देवणे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रास्ताविक व स्वागत अनिल घाटगे यांनी केले. सरचिटणीस सुनील देसाई यांनी आभार मानले. यावेळी जहिदा मुजावर, निरंजन कदम, सुहास साळोखे, संजय कुराडे, रियाज कागदी, लालासोहेब जगताप, शीतल तिवडे, मंगल कट्टी, सुमन वाडेकर, सुनील जाधव, सुनील काटकर, लहू शिंदे, संजय पडवळे, हेमा लुगारे आदी उपस्थित होते.

फोटो नं. २११२२०२०-कोल-सत्कार एनसीपी

ओळ :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: NCP planting trees, felicitating Corona warriors