शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

… आणि खा. श्रीनिवास पाटील यांनी दिला शरद पवारांच्या गाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 21:28 IST

छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले.

दुर्वा दळवी

कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प सभा शनिवारी पार पडणार होती. पण त्या आधीच छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शरद पवार, शाहू महाराज आणि खासदार श्रीनिवास पाटील गोल्फ कार्टमधून हे प्रदर्शन पाहत होते. या गाडीच सारथ्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील करत होते.  

अर्ध्याहून अधिक प्रदर्शन पाहून झाल्यावर इलेक्ट्रीक गाडीत काही तरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी काही सुरू होईना. गृहराज्यमंत्र्यांनी थोडा वेळ गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण गाडी काही केल्या सुरू होईना आणि मागे महाराजांसोबत बसलेल्या खासदारांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी गाडीला धक्का देऊन पुढे नेण्याचं ठरलं. तसं खासदार श्रीनिवास पाटील गाडीतून खाली उतरले आणि चक्क गाडीला धक्का देण्यासाठी त्यांनी हात लावला. वयाची ८० वर्षे पार केलेले श्रीनिवास पाटील यांनी वयाची तमा न बाळगता यावेळी गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यानं कार्यतत्परता दाखवली. गाडीत बसलेले शरद पवार यांना पुढील नियोजित सभेला पोहोचण्यास यामुळे वेळ लागू शकतो हे बरोबर ओळखून खासदारांनी गाडीला धक्का दिला. जमलेल्या नागरिकांनी ही खासदारांची कृती पाहीली नी क्षणभर काय होत आहे हे कुणाला काही समजलं नाही. नंतर मात्र शरद पवार यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहीलं आणि ते सभास्थळी रवाना झाले. श्रीनिवास पाटील यांचा राजकारणात आज ही सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या कृतीमुळे सातारची ताकद ही त्यांनी दाखविली आहे असं म्हणायला हरकत नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShrinivas Patilश्रीनिवास पाटील