शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मागे ‘ईडी’ लागली की ‘खोकी’ मिळाली?, व्ही.बी. पाटीलांचा आमदार राजेश पाटीलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:05 IST

डिपॉझिट जप्त करून जनताच तुम्हाला धडा शिकवेल

गडहिंग्लज : तुमच्या मागे ‘ईडी’ लागली आहे का? तुम्ही ज्यांना साथ दिली, त्यांनी गोकुळ, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत तुमची काय अवस्था केली होती? तुम्हाला कोणती अडचण होती, त्यामुळे तुम्ही शरद पवारांचे विचार सोडले. दिवंगत मंडलिक व नरसिंगरावांशी असलेली निष्ठाही तुम्ही सोडलात. तुम्हालाही खोकी मिळाली का? डिपॉझिट जप्त करून जनताच तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांना दिला.येथील नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित शरद पवार समर्थकांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार राजीव आवळे, आर.के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.राजीव आवळे म्हणाले, मिरजेच्या दंगलीमुळे अनेकांचा राजकीय बळी गेला, परंतु त्यातूनही मुश्रीफ तरले ते केवळ शरद पवारांमुळेच. पवारांमुळेच ते श्रावणबाळ, महाडॉक्टर झाले. त्यांनी आता जनतेला गृहित धरू नये.अमर चव्हाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादांचा महाराष्ट्र शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.आर.के. पोवार म्हणाले, दिल्लीतील बदमाशाच्या मागे गेलेल्यांना कोल्हापूरची जनताच नक्की धडा शिकवेल.याप्रसंगी शिवाजी खोत, नितीन जांभळे, अनिल घाटगे, गोविंद पाटील, बी.डी. पाटील, आनंदा जाधव, शिवाजी माने, कार्तिक कोलेकर, बसवराज नंदगावे, संजय नाईक, लखन बेनाडे, अंकुश रणदिवे, गणपतराव पट्टणकुडी यांनीही मनोगत व्यक्त केले.मेळाव्यास राजेंद्र मांडेकर, उदय चव्हाण, शिवाजी राऊत, बाबूराव माने, शिवाजी सावंत, भैरू खांडेकर, रवींद्र पाटील, रोहित पाटील आदींसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होते. शिवप्रसाद तेली यांनी स्वागत केले. बाळासाहेब महाडिक यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण