राष्ट्रवादीतर्फे पोलिसांना फेसशिल्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST2021-04-26T04:20:17+5:302021-04-26T04:20:17+5:30

काेल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. ड्युटीच्या ...

NCP distributes face shields to police | राष्ट्रवादीतर्फे पोलिसांना फेसशिल्डचे वाटप

राष्ट्रवादीतर्फे पोलिसांना फेसशिल्डचे वाटप

काेल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. ड्युटीच्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी त्याचे वाटप केले.

महापूर असो अथवा इतर कोणत्याही नैसर्गिक संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मदतीसाठी पुढे असतो. त्यातूनच महापुरात नुकसान झालेल्या कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे बाधित सर्व गावांत पक्षाची मदत पोहोचली होती. त्यानंतर मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले, त्यावेळीही पक्षाच्या वतीने सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्डबरोबरच गरीब कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. आताही त्यांनी चोवीस तास रस्त्यावर उभा राहून जनतेचे रक्षण करणाऱ्या पाेलीस मित्रांना फेसशिल्डचे वाटप केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेहमीच सामाजिक कामात पुढे राहिल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिली.

फोटो ओळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिसांना फेसशिल्डचे वाटप जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. (फोटो-२५०४२०२१-कोल-एनसीपी)

Web Title: NCP distributes face shields to police