शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: October 26, 2015 00:49 IST

संख्याबळाचे राजकारण : विनय कोरेंना संधी देण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचाली

राजाराम लोंढे --कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर (विधानपरिषद) राष्ट्रवादी कॉँग्रेसने दावा सांगितला आहे. संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक नेते आक्रमक झाले असून, पक्षाच्या पातळीवरही त्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेतील बलाबल वगळता पक्षीय पातळीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच १०३ सदस्यांसह आघाडीवर असल्याने त्यांच्या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जागा पदरात पाडून घेऊन विनय कोरे यांना संधी देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. राज्यातील आठ विधानपरिषद जागांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या जागेचा समावेश असून या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी झालेली आहे. आठपैकी एकाच ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. कोल्हापूरची जागा कॉँग्रेसच्या वाटणीवर आहे. आमदार महादेवराव महाडिक येथून प्रतिनिधित्व करीत आहेत. ते पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही केलेली आहे. कॉँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी मागितली असली तरी प्रत्येक निवडणुकीतील त्यांची सोयीची भूमिका त्यांना अडचणीची ठरणार आहे. कॉँग्रेसकडून विरोध होणार हे लक्षात घेऊनच त्यांनी महापालिका निवडणुकीत ‘भाजप-ताराराणी’ची मोट बांधून दुसरा पर्याय ठेवला आहे.नगरपालिका, जिल्हा परिषदेमधील वाढलेल्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादी कॉँग्रेसने या जागेवर दावा सांगितला आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षात विधानपरिषदेसाठी हालचाली गतिमान होणार असल्या तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी कोल्हापूरच्या जागेबाबत माहिती मागितली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य, मित्रपक्षांची सदस्यसंख्या किती? महापालिकेत अपेक्षित जागा किती आहेत? याशिवाय कॉँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्या संख्याबळाची माहितीही प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली आहे. महापालिकेतील संख्याबळ वगळता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आठ नगरपालिकांमधील ८३ नगरसेवक, जिल्हा परिषदेचे १७ सदस्य, तीन पंचायत समितीचे सभापती असे १०३ सदस्य आहेत. नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे २३ नगरसेवक, सहा जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सभापती असे ३० सदस्य आहेत. राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्ष आघाडीचे १३३ सदस्य आहेत. याउलट कॉँग्रेसचे सहा नगरपालिकांत ५६ नगरसेवक, जिल्हा परिषदेमधील ३० सदस्य, पंचायत समितीचे ७ सभापती असे ९३ सदस्य आहेत. याशिवाय शेतकरी संघटना ६, शिवसेना १५, भाजप ६, जनता दल ८, पाटील-मुरगूडकर गट ९ व अपक्ष १७ असे बलाबल आहे. महापालिकेतील संख्याबळ वगळता आता सर्वांत मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे १०३ सदस्य आहेत. जनसुराज्य या नैसर्गिक मित्रपक्षाला सोबत घेतले तर हा आकडा १३३ पर्यंत जातो. विजयासाठी एकूण ३६१ सदस्यांपैकी १८१ हा आकडा पार करावा लागणार आहे. त्यामुळे या आकड्यापर्यंत राष्ट्रवादी सहज पोहोचू शकतो. या संख्याबळावरच राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यात कॉँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नाहीत. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचेही नाव कॉँग्रेसकडून पुढे येत आहे; पण या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. सतेज पाटील यांना चालणारा चेहरा व महाडिकविरोधक म्हणून विनय कोरे यांचे नाव पुढे येऊ शकते. मुश्रीफ-बंटी-कोरेच ठरविणार आमदार नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील बलाबल पाहिले तर हसन मुश्रीफ, सतेज पाटील व विनय कोरे यांचेच येथे वर्चस्व आहे. महापालिकेतील संभाव्य बलाबल पाहिले तर हे तीन नेतेच उद्याचा आमदार ठरवणार हे नक्की आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय बलाबलनगरपालिकाराष्ट्रवादी कॉँग्रेसजनसुराज्यकॉँग्रेसशिवसेनाभाजपज. द.पाटील गटअपक्ष कुरुंदवाड८- ३ --- - ६जयसिंगपूर१४ - ९- -- --पेठवडगाव६- ९- - - - -मलकापूर७५- ५ ----गडहिंग्लज९१- --७- -कागल१५- २-- - --मुरगूड ४-४---९-पन्हाळा-१७--- ---इचलकरंजी२० (श.वि.- ९)-२९४४ ---——————————————————————————————————————————————एकूण८३२३५६९४७९६ ——————————————————————————————————————————————जिल्हा परिषदराष्ट्रवादीकॉँग्रेसजनसु.शिवसेनाभाजपस्वा.शे. शहर विकासशा. वि.६९ (एकूण)१७३०६६२५१३पंचायत समिती३ ७१--१--