राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायबर चौकात किरण सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:22+5:302021-09-14T04:29:22+5:30
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपाबाबत निषेध नोंदवत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे सायबर ...

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायबर चौकात किरण सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपाबाबत निषेध नोंदवत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे सायबर चौकात दहन करण्यात आले. कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे श्रावणबाळ म्हणून ओळखणारे मंत्री हसन मुश्रीफ हे गेली १७ वर्षे मंत्रिपदावरून राज्यातील जनतेची सेवा बजावत असताना अशा नेतृत्वावर बिनबुडाचे आरोप कोल्हापूर कधीही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांची माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असाही इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात बैजू पाथरवट, दिलावर पठाण, महेश कांजार, राजाराम सुतार, सुरेंद्र माने, प्रीतम काळे, पंकज वाघमारे, दीपक कश्यप, आकाश पाथरुट, हेमलता पोळ, मुमताज बंधुवाले, सुप्रिया साळी, अलका वाघेला आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो नं. १३०९२०२१-कोल-सायबर,०१
ओळ : कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील सायबर चौकात दक्षिण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले.
130921\13kol_6_13092021_5.jpg~130921\13kol_7_13092021_5.jpg
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे सोमवारी सायंकाळी कोल्हापूरातील सायबर चौकात दक्षीण राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने दहन करण्यात आले. ~कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे सोमवारी सायंकाळी कोल्हापूरातील सायबर चौकात दक्षीण राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने दहन करण्यात आले.