शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘बिद्री’त राष्ट्रवादी-भाजप एकत्र-- भाजपला सहा जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:06 IST

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची

ठळक मुद्दे: शेतकºयांच्या हितासाठीच राजकारण बाजूला : हाळवणकरपण राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही,

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत तीन-चार बैठका झाल्या, चर्चेअंती सहा जागा देण्यावर एकमत झाले. आता भाजपमध्ये गेलेली मंडळी कधी ना कधी आमच्या पॅनेलमध्ये होतीच. गेल्या वेळेला राजे विक्रमसिंह घाटगे, प्रवीणसिंह पाटील, विजयसिंह मोरे, तर बजरंग देसाईही एकवेळ आमच्यासोबत होते. आता भाजपचे लेबल लावून सोबत आहेत एवढाच फरक आहे. जिल्ह्णातील सर्वांत सक्षम बिद्री साखर कारखाना असून, वाढीव सभासदांच्या गुंत्यामुळेच निवडणूक वेळेवर न झाल्यानेच प्रशासक आले. आता आम्ही निवडणूक ताकदीने लढवून जिंकणारच, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पारदर्शक कारभार करीत सक्षम आर्थिक स्थिती व कर्जमुक्त कारखाना केवळ के. पी. पाटील यांच्यामुळेच झाला. त्यामुळेच राजकारण व तत्त्वप्रणाली बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी आम्ही एकत्र आल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. स्वतंत्र लढण्याबाबत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता; पण साखर कारखान्याचे राजकारण हे सभासदांच्या संख्येवर असते. आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर तेरा-चौदा हजार मतांपर्यंत गेलो असतो, असेही त्यांनी सांगितले.कारखान्याचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, तेरा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पारदर्शक व काटकसरीचा कारभार केल्यानेच कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली. आगामी काळात इथेनॉल, डिस्टिलरी प्रकल्पांची उभारणी करणार असून, ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजन करणार आहे.कारखान्याच्या हितासाठी सरकारची मदत गरजेची असते. यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आघाडी केल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, रणजित पाटील, हिंदुराव शेळके, समरजितसिंह घाटगे गटाचे यशवंत माने व प्रकाश पाटील उपस्थित होते.विरोधकांत एकवाक्यतेचा अभावविरोधी आघाडीने आठ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता; पण तिथे नेत्यांची संख्या जास्त असल्याने एकवाक्यता नसल्यानेच दोन जागा कमी मिळाल्या तरी चालेल; पण राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही, कारखान्याची सत्ता केवळ राजकीय अड्डा करण्यासाठीच हवी असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.पॅनेलची घोषणा २५ सप्टेंबरलाभाजपला सहा जागा मिळाल्या असल्या तरी त्या कोणत्या गटातील घ्यायच्या याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून ठरविल्या जातील. २५-२६ सप्टेंबरला राष्ट्रवादी-भाजप पॅनेलची घोषणा केली जाईल, असे हाळवणकर यांनी सांगितले.स्थानिक काँग्रेस आघाडीसोबतच‘आण्णा तुम्ही कॉँग्रेसचे की....’ अशी विचारणा केली असता. आपण कॉँग्रेस म्हणूनच आलो आहे. भुदरगड तालुक्यातील कॉँग्रेस ही राष्ट्रवादी-भाजप आघाडीसोबत राहणार असल्याची माहिती माजी आमदार बजरंग देसाई यांनी दिली.मुरगूडकर घरातील पेच व्यवस्थित सोडवूकागल व भुदरगड तालुक्यांत एकाच घरात दोन-दोन उमेदवार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर हाळवणकर म्हणाले, रणजित पाटील व प्रवीणसिंह पाटील-मुरगूडकर यांच्याबाबत विचारत असाल तर हा पेच व्यवस्थित सोडवू .‘बिद्री’त खरी लोकशाही!शेतकºयांनी स्वत:चे दागिने विकून कारखान्याचा शेअर्स खरेदी केला आणि सहवीज प्रकल्प उभा राहिला. त्यांना अपात्र ठरविल्याने विरोधकांमध्ये रोष आहे. ‘बिद्री’मध्ये ऊस घालणाºया प्रत्येकाला सभासद केले जात असल्याने खरी लोकशाही येथे असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.