शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

Navratri : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 16:44 IST

शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याने या दिवशी ही पूजा बांधली जाते.

ठळक मुद्देकरवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात पूजातिरूपती देवस्थानचा शालू अर्पण

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याने या दिवशी ही पूजा बांधली जाते.नवरात्रौत्सवात अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जगदंबा आदिशक्तीने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला. त्रिलोकाला त्रास देणारा आसुर या तिथीला संपला; पण त्याहीपेक्षा ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरासाठी ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा येणारा उल्लेख सार्थ करणारी अशी ही महातिथीची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. ही पूजा सारंग मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, मनोज मुनीश्वर यांनी बांधली.

तिरूपती देवस्थानचा शालू अर्पणदरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता तिरूपती देवस्थानने श्री अंबाबाईच्या चरणी शालू अर्पण केला. सोनेरी रंग आणि लाल काठाच्या या शालूची किंमत १ लाख ३ हजार ९०० इतकी आहे. तिरूपती देवस्थानचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आॅफिसर पी. अशोककुमार, डी. विजयरेखा यांनी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर व सदस्या संगीता खाडे यांच्याकडे हा शालू सुपूर्द केला.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, बी. एन. पाटील-मुगळीकर, सुभाष वोरा, के. रामाराव, संदीप दोशी, निहारिका, सात्त्विका, नित्यवर्धन उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर