नवरात्रोत्सवाचे उत्पन्न ७७ लाख
By Admin | Updated: October 23, 2014 00:10 IST2014-10-22T21:42:39+5:302014-10-23T00:10:27+5:30
देवस्थानला मिळालेले उत्पन्न

नवरात्रोत्सवाचे उत्पन्न ७७ लाख
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला ७७ लाख ५४ हजार ३८० इतके उत्पन्न मिळाले आहे.
शारदीय नवरात्रोत्सव काळात यंदा १५ लाख भाविकांनी भेट दिल्याची नोंद देवस्थान समितीच्या डोअर मेटल डिटेक्टरवर झाली आहे. व्यवस्थापन समितीला सर्वाधिक उत्पन्न नवरात्रोत्सवात मिळते. यंदा धार्मिक विधी, देणगी, अन्नछत्र देणगी, साडी विक्री, शाश्वत पूजा, लाडू प्रसाद विक्री, महाप्रसाद देणगी यांसह पाच पेट्यांमधील रक्कम असे एकूण ७७ लाख ५४ हजार ३८० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय आवारातील आणखी चार लहान पेट्यांमधील रकमेची मोजदाद झालेली नाही. ही रक्कम साधारण १० लाख होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समितीने दिली. (प्रतिनिधी)
देवस्थानला मिळालेले उत्पन्न
धार्मिक विधी : ८ लाख ३९ हजार ३२२ - देणगी : ३ लाख ७७८ अन्नछत्र देणगी : २ लाख ३५ हजार ५९९ साडी विक्री : २ लाख ९५ हजार ०३१ शाश्वत पूजा : ४५ हजार १ लाडू विक्री : ८ लाख ५९ हजार २५० महाप्रसाद देणगी : १ लाख ५० हजार ६२५ पाच पेट्यांमधील रक्कम : ५० लाख २८ हजार ७७५ एकूण उत्पन्न : ७७ लाख ५४ हजार ३८०