कोल्हापूरमध्ये शाहुपुरीत नवग्रह रत्न केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:38+5:302021-03-17T04:25:38+5:30
कोल्हापूर : कोणताही व्यवसाय असो; तो वडिलोपार्जित असेल आणि पारंपरिक असेल तर कुटुंबातील सर्वजण अंगीकार करून तो व्यवसाय अधिक ...

कोल्हापूरमध्ये शाहुपुरीत नवग्रह रत्न केंद्र सुरू
कोल्हापूर : कोणताही व्यवसाय असो; तो वडिलोपार्जित असेल आणि पारंपरिक असेल तर कुटुंबातील सर्वजण अंगीकार करून तो व्यवसाय अधिक वृद्धिंगत करीत असतात. असाच वारसा अन्नू एच. मोतीवाला या चालवीत आहेत. वडिलोपार्जित असणारी रत्नपारखी विद्या त्यांनी जोपासली असून, कोल्हापूरमध्ये ‘नवग्रह रत्न केंद्र’ असेंब्ली रोड, शाहुपुरी येथे सुरू केले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून अंकशास्त्र, जोतिषशास्त्र, कुंडली, हस्तरेखा आणि फेसरीडिंग याच्यावरून अभ्यास करून रत्न सुचविणे हे काम या केंद्राद्वारे अन्नू एच. मोतीवाला या करणार असून, आयुष्यात खऱ्या रत्नांचे किती महत्त्व आहे, याची माहिती आणि नवरत्न यांची उपलब्धता केंद्राच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. गुजरातमधील एच. के. मोतीवाला यांनी लहानपणापासूनच ही कला वडिलांकडून व आजोबांकडून अवगत केली. विविध देशांमध्ये त्यांना डायमंड शोधण्यासाठी बोलावले जात होते. डायमंडची त्यांना चांगली पारख होती. त्यामध्ये ते पारंगत होते; त्यामुळे फॉरेन केंद्रांमध्येही त्यांना बोलाविण्यात येत होते. मोतीवाला यांनी रत्नपारखीची डिग्री गुजरातमध्ये घेतली असून, वयाच्या तेराव्या वर्षांपासून ज्ञान ग्रहण केले आहे. ही नवग्रह नवरत्ने धारण केल्याने आयुष्यात व्यवसाय, नोकरी, आरोग्य, शिक्षण, विवाह जुळणे, कोर्टकचेरी या सर्व बाबतींत लोकांना मार्गदर्शन मिळते, असाही दावा त्यांनी केला. या केंद्राचे उद्घाटन डॉ. प्रांजली धामणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय भोसले, सत्यजित भोसले, डॉ. यशोधरा भोसले आदी उपस्थित होते.