किणी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मास अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:38+5:302021-02-05T07:05:38+5:30

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्यावतीने १७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मास अभियान राबविण्यात ...

National Security Mass Campaign at Kini High School | किणी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मास अभियान

किणी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मास अभियान

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्यावतीने १७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मास अभियान राबविण्यात येत आहे.

यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम, रस्ते वाहतूक व अपघात या विषयावर चित्रकला, घोषवाक्य व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व्ही. बी. कुंभार यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे, पर्यवेक्षक डी. एच. पाटील, पोलीस नाईक आर. आर. गायकवाड, सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: National Security Mass Campaign at Kini High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.