शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

कोल्हापुरातील कलाशिक्षक सागर बगाडे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:59 IST

कोल्हापूर : येथील चित्रकार, रंगकर्मी, नृत्यकर्मी व स. म. लोहिया हायस्कूलमधील कला शिक्षक सागर चित्तरंजन बगाडे (रा. पाचगाव, ता. ...

कोल्हापूर : येथील चित्रकार, रंगकर्मी, नृत्यकर्मी व स. म. लोहिया हायस्कूलमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे (रा. पाचगाव, ता. करवीर) यांना मंगळवारी ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला. ५ सप्टेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.पंढरपूर येथील प्रार्थना समाजाकडून चालवण्यात येणारे वा. बा. नवरंगे बालकाश्रमात अनाथ म्हणून जगण्याची सुरुवात केलेल्या सागर यांना जीवनाच्या सुरुवातीला अनेक संघर्षाला सामाेरे जावे लागले; परंतु त्यांनी हिमतीने जीवन घडवले व बाल कल्याण संकुलातील अनेक मुलांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी ते सतत धडपड करत राहिले. पंढरपूरच्या बालकाश्रमातील मुलांसाठी त्यांनी अनेक वर्षे ‘मामाचा गाव’ हा उपक्रम राबवून त्यांच्या गुणांना संधी दिली. आपण ज्या संस्थेतून घडलो, त्या संस्थेतील राज्यभरातील मुलांसाठी काहीही करायचे झाल्यास बगाडे सगळ्यात पुढे राहिले आहेत.बगाडे हे गेली २४ वर्षे स. म. लोहिया हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते स्वत: उत्तम चित्रकार, रंगकर्मी व नृत्य दिग्दर्शक आहेत. सार्थक क्रिएशन या नृत्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक गाजवला आहे. यासह ते कोल्हापुरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनाथ व निराधार बालके, सेक्सवर्कर अशा वंचित घटकांसाठी काम केले आहे. महापुरात नागरिकांच्या बचावकार्यात ते सहभागी होते.या पुरस्कारासाठी जुलै महिन्यात राष्ट्रीय पातळीवरून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हा, राज्य व केंद्रस्तरावरील मुलाखती, छाननीनंतर अंतिम फेरीसाठी राज्यातील ६ शिक्षकांची निवड झाली होती. त्यामधून कोल्हापुरातील सागर बगाडे व गडचिरोली येथील मंतैय्या बेडके यांना पुरस्कार जाहीर झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPresidentराष्ट्राध्यक्षTeacherशिक्षक