शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रविवारपासून राष्ट्रीय किसान परिषद : रघूनाथदादा पाटील, देशातील जनतेला तिसरा पर्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:57 IST

देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी परिषददरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेअशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर काय

कोल्हापूर : देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, सरकार बदलली पण प्रश्न तसेच राहिले आहेत. जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे बदलत नाही तोपर्यत प्रश्न कायम राहणार आहेत. कायदे बदलण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाची रणनिती परिषदेत ठरविली जाणार असून हुतात्मा बाबू गेणू व शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १२ डिसेंबरला परिषदेची सांगता होणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दूध दराबाबत सरकारने संघांपुढे गुडघे टेकले असून ही त्यांची नामुष्की आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे सरकार कारखानदार चालवत होते पण भाजपचे सरकारच त्यांनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पी. जी. पाटील, माणिक शिंदे, आदम मुजावर, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

दरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!उत्तर प्रदेश, गुजरातमधील ऊस दराशी तुलना केली तर येथे प्रतिटन सातशे रूपये तर बगॅसच्या माध्यमातून सहाशे असे टनाला १३०० रूपयांचा दरोडा कारखानदारांनी घातला आहे. या मागील मास्टर मार्इंड शरद पवार, गोपीनाथ मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, अशोक चव्हाण आहेत. या पैशावरच त्यांचे राजकारण चालते असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेवाजपेयी सरकारच्या काळात कांद्याच्या दरावरून चार राज्यातील भाजपची सरकारे पडल्याने कांद्याला जीवनाश्यक वस्तूत टाकणारे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हाच होते. त्यांनी झाडा खाली झोपले काय आणि हिमालयात जाऊन सन्यास घेतला तरी शेतकºयांना फरक पडत नसल्याची टीका पाटील यांनी केली.

अशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर कायदोन वर्षापुर्वी २३०० रूपये एफआरपी झाली, ती देता येत नाही म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्या अशोक चव्हाण यांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल गळे काढण्याचा अधिकार तरी काय. राजू शेट्टी - चव्हाण भेटीला फारसे महत्व नसून दोघेही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. टनाला दीड हजार रूपये कारखानदार हाणत आहेत, त्याच्या समोर जीएसटीची मुद्दा गौण असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर