शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप : संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 6:39 PM

Kolhapur Flood : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप : संजय मंडलिकगडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी

गडहिंग्लज : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.बुधवारी (२८) खासदार मंडलिक यांनी गडहिंग्लज शहरासह अरळगुंडी, कडलगे, नांगनूर, हिटणी, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, जरळी, इंचनाळ व ऐनापूर येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. घरांच्या आणि पिकांच्या नुकसान भरपाईत एकही माणूस शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.मंडलिक म्हणाले, सातारा ते कागलपर्यंतच्या सहापदरी महामार्ग रूंदीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत आपण संबंधित गावांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनांमधूनही राष्ट्रीय महामार्ग हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महामार्ग रूंदीकरणाच्यावेळी त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्गाबरोबरच पूररेषेतील अनधिकृत बांधकामांमुळेच कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रात बांधकामे होणार नाहीत याची दक्षता महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी घ्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.हा संशोधनाचा भाग..!केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ७०० कोटीच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, ही मदत २०१९ च्या पुराची की यावर्षीच्या पुराची आहे हा संशोधनाचा भाग आहे, अशी टीप्पणीही खासदार मंडलिक यांनी यावेळी केली.अधिकाऱ्यांचे अभिनंदन..!महापुराच्या काळात पूरबाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देवून लोकांचे मनोबल उंचावण्याचे काम गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी व तहसिलदारांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असेही मंडलिक यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूर