कोल्हापूरच्या स्पर्धकांची चमकदार कामगिरी राष्ट्रीय डर्ट ट्रॅक स्पर्धा : ९३ नामांकित मोटोक्रॉसपटूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:06 IST2018-01-11T01:04:47+5:302018-01-11T01:06:35+5:30
कोल्हापूर : पुण्यातील हडपसर येथे झालेल्या पुणे राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटार स्पोर्टस् स्पर्धेत कोल्हापूरच्या स्पर्धकांनी

कोल्हापूरच्या स्पर्धकांची चमकदार कामगिरी राष्ट्रीय डर्ट ट्रॅक स्पर्धा : ९३ नामांकित मोटोक्रॉसपटूंचा सहभाग
कोल्हापूर : पुण्यातील हडपसर येथे झालेल्या पुणे राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटार स्पोर्टस् स्पर्धेत कोल्हापूरच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. १७ हून अधिक गटांत बक्षिसे मिळविली.
देशभरातून या स्पर्धेसाठी ९३ नामांकित मोटोक्रॉसपटू सहभागी झाले होते. त्यात कोल्हापूरच्या १७ जणांचा समावेश होता. सर्वाधिक विजेतेपद पटकावून स्पर्धेचे सांघिक विजेतेपदही कोल्हापूरकरांनी पटकाविले. त्यात नवोदित गटात अमृत दुधाणे (प्रथम), राजू बेल्लाड (द्वितीय).
नवोदित गट रेस -२ व वरिष्ठ गटामध्ये बाळकृष्ण आडके अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. महिला मोटारसायकल स्पर्धेत पल्लवी यादव (द्वितीय) यांचा समावेश होता. या स्पर्धकांना प्रशिक्षक आशितोष काळे यांचे मार्गदर्शन व जयदीप पवार, हश्यम जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ एशिया पॅसिफिक कार रॅली विजेते संजय टकले व फेडरेशन मोटार स्पोर्टस् असोसिएशन पदाधिकाºयांच्या उपस्थित झाला.
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटारक्रॉस स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविलेल्या कोल्हापूरच्या संघासोबत प्रशिक्षक आशितोष काळे उपस्थित होते.