‘केएमटी’ उपक्रमास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: February 25, 2015 00:38 IST2015-02-25T00:37:22+5:302015-02-25T00:38:00+5:30
पोवार : अहमदाबाद येथे १६ मार्चला वितरण

‘केएमटी’ उपक्रमास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडत असतानाही महापालिकेच्या परिवहन उपक्रम असलेल्या ‘केएमटी’ने उपलब्ध गाड्यांचा वापर करीत प्रतिदिन प्रतिबस २४० किलोमीटर इतकी धाव घेण्यात यश मिळविले. केएमटीच्या सन २०१२-१३च्या उपक्रमांचा आढावा घेत राष्ट्रीय पातळीवरील ‘मॅक्झिमम इम्प्रुव्हमेंट इन व्हेईकल प्रॉडक्टिव्हीटी’ (शहरी सेवा) साठीचा पुरस्कार जाहीर झाला. १६ मार्चला अहमदाबाद येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती परिवहन सभापती अजित पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत केएमटीने ताफ्यातील १०० हून अधिक बसेसचा वापर करीत अधिकाधिक बसेस मार्गस्थ ठेवण्यात यश मिळविले. केएमटीच्या प्रवासीसेवेच्या कामगिरीचा आढावा घेऊन असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग्ज् (एएसआरटीयू) या नवी दिल्लीतील परिवहन उपक्रमांच्या शिखर संस्थेने राष्ट्रीय पुरस्कारासाठी केएमटीची निवड केली. यात प्रवासी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे पोवार यांनी म्हटले.म् (प्रतिनिधी)
केएमटीच्या विविध उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने प्रशासन व कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. केएमटीच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन १०४ बसेसचे प्रवाशांच्या मागणीनुसार योग्य नियोजन केले आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात केएमटी आणखी एक पाऊल पुढे टाकेल.
- अजित पोवार, परिवहन सभापती