अभिषेक गवळी याला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST2021-09-07T04:29:56+5:302021-09-07T04:29:56+5:30

करंजफेण: श्रीपतराव चौगुले आर्टस ॲन्ड सायन्स कॉलेज माळवाडी- कोतोली येथील विद्यार्थी अभिषेक दीपक गवळी याने स्केटिंग या खेळामध्ये विशेष ...

National Award to Abhishek Gawli | अभिषेक गवळी याला राष्ट्रीय पुरस्कार

अभिषेक गवळी याला राष्ट्रीय पुरस्कार

करंजफेण: श्रीपतराव चौगुले आर्टस ॲन्ड सायन्स कॉलेज माळवाडी- कोतोली येथील विद्यार्थी अभिषेक दीपक गवळी याने स्केटिंग या खेळामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले. अभिषेक गवळीचा मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषदेकडून राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यास ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्या डॉ. वंदना पाटील, आय.क्यु.एसी. समन्वयक डॉ. बी. एन. रावण, जिमखाना विभागप्रमुख डॉ. यु. एन. लाड यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजचा विद्यार्थी अभिषेक गवळीचा स्केटिग खेळातील प्रमाणपत्र देऊन सत्कार करताना माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, खजानिस एम. एस. चौगुले, डॉ. बी. एन. रावण, डॉ. यू. एन. लाड आदी.

Web Title: National Award to Abhishek Gawli