सांगावकर अकॅडमी, मोगणे सहारा विजयी
By Admin | Updated: February 26, 2015 00:07 IST2015-02-25T23:29:21+5:302015-02-26T00:07:00+5:30
नाना चौगुले चषक क्रिकेट स्पर्धा

सांगावकर अकॅडमी, मोगणे सहारा विजयी
कोल्हापूर : अनिल सांगावकर अकॅडमीने सी सॉल्ट संघाचा, तर अण्णा मोगणे सहारा संघाने पॅकर्स क्रिकेट क्लबचा पराभव करीत चौदा वर्षांखालील नाना चौगुले चषक क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. शास्त्रीनगर मैदान येथे बुधवारी पहिला सामना अनिल सांगावकर अकॅडमी विरुद्ध सी सॉल्ट संघ यांच्यात झाला. हा सामना सांगावकर अकॅडमीने १ डाव १०५ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सांगावकर अकॅडमीने ९० षटकांत सर्वबाद ५०९ धावा केल्या. यामध्ये प्रथमेश बाजरी १८० धावा व तुषार पाटील १०५, शुभम नलवडे याने ५१ धावा व ८ बळी घेतले. सी सॉल्टकडून मोहीज मुजावर याने चार बळी घेतले.
उत्तरादाखल सी सॉल्टचा पहिला डाव सर्वबाद ३७ धावांत, तर दुसरा डाव २०२ धावांत गुंडाळला. यामध्ये मोहीज मुजावर याने एकाकी झुंज देत १०४ धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली.
सांगावकर संघाकडून शुभम नलवडे, यश मोरे, प्रथमेश साठे, अभिषेक निशाद यांनी चांगली कामगिरी केली.
दुसरा सामना अण्णा मोगणे सहारा संघ विरुद्ध पॅकर्स क्रिकेट क्लब यांच्यात झाला. हा सामना मोगणे संघाने ११२ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मोगणे संघाने सर्वबाद २६६ धावा केल्या.
यात श्रीराज चव्हाण याने १०२ धावा केल्या. पॅकर्स संघाने पहिल्या डावात सर्वबाद १६४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात सर्वबाद १०८ धावा केल्या. अण्णा मोगणे संघाने ११२ धावांनी विजय मिळविला. (प्रतिनिधी)