नृसिंहवाडीच्या दहा सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार ?

By Admin | Updated: January 21, 2015 23:51 IST2015-01-21T21:33:33+5:302015-01-21T23:51:11+5:30

कथित गाळे बांधकाम प्रकरण : २७ ला सुनावणी

Narsinghwadi warrior sword on ten members? | नृसिंहवाडीच्या दहा सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार ?

नृसिंहवाडीच्या दहा सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार ?

शिरोळ : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील कथित बेकायदेशीर गाळे बांधकामप्रकरणी २७ जानेवारी रोजी पुणे आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सरपंचासह दहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे. सरपंच राजश्री कांबळे, सदस्य अनंतराव धनवडे, मुरलीधर गवळी, अशोक पुजारी, अभिजित जगदाळे, मनीषा पतंगे, अरूणधंती पुजारी, परशराम गवंडी, राजेंद्र अणुजे व कांचन कंदले यांनी बेकायदेशीर ठराव करून ग्रामपंचायत स्टेडियम व विठ्ठलमंदिर गाळे बांधकामास परवानगी दिल्याची तक्रार आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. प्रथमदर्शनी चौकशीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या कथित प्रकरणाचा अहवाल पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, आंदोलन अंकुशचे चुडमुंगे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबतची सुनावणी होणार आहे.

जि.प.समोर उपोषण
गाळे बांधकाम फेर निविदाप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे, अशा आशयाचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले असल्याची माहिती, धनाजी चुडमुंगे यांनी दिली.

Web Title: Narsinghwadi warrior sword on ten members?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.