सांगावकर अकॅ डमीकडे ‘पाटील चषक’

By Admin | Updated: December 6, 2014 00:28 IST2014-12-06T00:07:18+5:302014-12-06T00:28:40+5:30

मयूर अकॅडमीवर आठ गडी राखून केली मात

Narayakkar Akademi's 'Patil Trophy' | सांगावकर अकॅ डमीकडे ‘पाटील चषक’

सांगावकर अकॅ डमीकडे ‘पाटील चषक’

कोल्हापूर : मालती पाटील चषक एकोणीस वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीने मयूर स्पोर्टस अकॅडमीचा आठ गडी राखून पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. सामन्यात प्रथमेश वंजारी व अनिकेत नलवडे यांनी चमकदार कामगिरी केली.
शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून मयूर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मयूर संघाने २३.४ षटकांत ७८ धावा केल्या. यामध्ये मंथन पाटील २७, सम्राट घोरपडे १३, कौस्तुभ रावण १० धावा केल्या. सांगावकर अकॅडमीकडून गोलंदाजी करताना प्रथमेश बाजारीने हॅट्ट्रिकसह ४, अनिकेत नलवडेने ३ अणि साद मुजावर २ व आकाश करगावेने एक बळी घेतला. उत्तरादाखल सांगावकर अकॅडमीने ७८ धावांचे हे आव्हान १३ षटकांत २ बाद ७९ असे पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.साद मुजावरने ४५, अनिकेत नलवडेने १२, वैष्णव संघमित्र याने ७ धावा केल्या.
विजयी संघ : हृषीकेश चौगुले, करण सांगावकर, आकाश करगावे, साद मुजावर, अनिकेत नलवडे, प्रथमेश बाजारी, प्रथमेश दिवेकर, वैष्णव संघमित्र, विश्वजित जगताप, साहिल जसवाल, सार्थक पाटील (प्रतिनिधी)

Web Title: Narayakkar Akademi's 'Patil Trophy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.