मुरगूडच्या नंदिनीची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST2021-03-05T04:23:26+5:302021-03-05T04:23:26+5:30

उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नंदिनीने महाराष्ट्राचे कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ...

Nandini of Murgud selected for World Wrestling Championship | मुरगूडच्या नंदिनीची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूडच्या नंदिनीची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नंदिनीने महाराष्ट्राचे कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ५३ किलो वजनी गटात तिने नेत्रदीपक कुस्त्या करत सुवर्णपदक मिळवल्याने याच वजनी गटात तिची भारतीय संघात निवड करण्यात आली.

नंदिनी मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती आखाड्यात प्रशिक्षण घेत आहे. डॉर्फ केटल केमिकल ग्रुप मुंबईची ती दत्तक मल्ल आहे. तिने आतापर्यंत राष्ट्रीय राज्यस्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. सिनिअर गटातील तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने तिच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तिला प्रशिक्षक दादासाहेब लवटे, सुखदेव येरुडकर, सागर देसाई, दयानंद खतकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Nandini of Murgud selected for World Wrestling Championship