शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

नांदणी सर्वात मोठी तर जुने दानवाड सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपल्यानंतर अर्ज छाननीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले ...

शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपल्यानंतर अर्ज छाननीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नांदणी असून सर्वात लहान ग्रामपंचायत जुने दानवाड आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी दमछाक झाली. ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदत मिळाल्याने अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या नांदणी गावचे मतदान १२०५८ तर सर्वात लहान ग्रामपंचायत असणाऱ्या जुने दानवाडचे मतदान १४६० इतके आहे. मोठ्या गावांमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.

चौकट -

गावनिहाय एकूण मतदान

आलास ४९५५, अर्जुनवाड ४६१०, बस्तवाड १७५३, बुबनाळ २५७०, चिपरी ६१६८, दानोळी ११०९१, जुने दानवाड १४६०, दत्तवाड ७१७४, धरणगुत्ती ५५०४, गणेशवाडी ४६५८, गौरवाड २३१९, घालवाड २०८४, घोसरवाड ७८७३, हसूर २०८८, जैनापूर २०१६, जांभळी ३८७६, कवठेगुलंद २८४७, कोंडीग्रे २०९३, कोथळी ६३८९, कुटवाड १७६६, मजरेवाडी २१५७, नांदणी १२०५८, निमशिरगांव ३६७७, नृसिंहवाडी ३६८९, शेडशाळ ४२०८, शिरदवाड ४७३८, शिरटी ४२२४, शिरढोण ६७५०, टाकळीवाडी २५६९, तमदलगे १६०५, तेरवाड ३४३७, उदगांव ९९३८, यड्राव ६७३१, बुबनाळ २५७०.

.............

उमेदवारांना द्यावी लागणार खर्चाची माहिती

उमेदवारी अर्ज भरल्यापासून उमेदवारांना दररोजच्या खर्चाचा तपशील खर्च तपासणी करणाऱ्या पथकास सादर करावा लागणार आहे. यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निकालापासून तीस दिवसांच्या आत खर्चाच्या तपशीलाबाबत अंतिम शपथपत्र सादर करावे लागणार आहे. मुदतीत खर्च दाखल न करणारे सदस्य अपात्र होऊ शकतात, अशी तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे.