नाना चौगुले स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: February 25, 2015 00:01 IST2015-02-24T23:41:20+5:302015-02-25T00:01:41+5:30
श्रीराज चव्हाणने १०२, शुभम मानेने ४६, जतीन तनवाणीने ५६, जय पाटीलने १० धावा केल्या. ‘सहारा’ने ठेवलेले धावांचे आव्हान घेऊन पॅकर्स संघ मैदानात उतरला.

नाना चौगुले स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर : येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरेश तथा नाना चौगुले स्मृतिचषक चौदा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेत सलामीच्या सामन्यात दिवसअखेर पॅकर्स संघाला ५ बाद १३२ धावा करता आल्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहारा स्पोर्टस्ने ४७.२ षटकांत सर्व बाद २६६ धावा केल्या. त्यात श्रीराज चव्हाणने १०२, शुभम मानेने ४६, जतीन तनवाणीने ५६, जय पाटीलने १० धावा केल्या. ‘सहारा’ने ठेवलेले धावांचे आव्हान घेऊन पॅकर्स संघ मैदानात उतरला. दिवसअखेरीस संघाला ५ बाद १३२ धावा करता आल्या आहेत. आव्हान पूर्ण करण्यासाठी बुधवारीदेखील संधी आहे. स्पर्धेचे उद्घाटन शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष रमेश पुरेकर, दिलीप शेटे, विजय भोसले, बापू मिठारी, सचिन चौगुले, ‘केडीसीए’चे सचिव रमेश कदम, उपाध्यक्ष चेतन चौगुले, संजय शेटे, वसंतराव चौगुले बँकेचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, ध्रुव केळवकर, विकास शिबे, आदी उपस्थित होते.