गडहिंग्लज मुख्य मार्गाला अण्णाभाऊ यांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:29+5:302021-08-21T04:28:29+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील शेरी ओढा ते गिजवणे ओढा या मुख्य रस्त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी ...

गडहिंग्लज मुख्य मार्गाला अण्णाभाऊ यांचे नाव द्या
गडहिंग्लज :
गडहिंग्लज शहरातील शेरी ओढा ते गिजवणे ओढा या मुख्य रस्त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज हे पुरोगामी शहर असून थोर विचारवंत व महापुरुषांचे पुतळे शहरात बसविण्यात आले आहेत; परंतु अण्णाभाऊंच्या नावाने शहरात काहीही नाही. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गाला अण्णाभाऊंचे नाव देण्यात यावे.
शिष्टमंडळात जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, संतोष कांबळे, बसवराज आजरी, 'मनसे' जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, 'आरपीआय'चे दिलीप कांबळे, दलित महासंघाचे बाबूराव आयवाळे, प्रकाश कांबळे, भीमशक्तीचे परशुराम कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, निंगाप्पा बारामती, विठ्ठल चुडाई, शिवाजी कांबळे आदींचा समावेश होता.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना बाबूराव आयवाळे व प्रकाश कांबळे यांनी निवेदन दिले. यावेळी राजेंद्र तारळे, संतोष कांबळे, अर्जुन दुंडगेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : २००८२०२१-गड-०३